आता चारित्र्यहनन अन खोटारडेपणा ? , महिला खेळाडूंच्या बदनामीसाठी ‘ टूल किट ‘

शेअर करा

संसदभवनाच्या उद्घाटन सोहळ्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या जंतरमंतर इथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीर महिला यांचे आंदोलन अक्षरशः दडपशाहीने चिरण्यात आले. महिला महापंचायत भरवून संसदेकडे जाण्यासाठी त्या निघालेल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांच्या इव्हेंटमध्ये कोणतेही अडचण नको यासाठी दिल्ली पोलिसांनी मानवतेच्या सगळ्या मर्यादा पार करत अत्यंत क्रूरपणे हे आंदोलन संपवल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. गोदी मीडिया आणि त्यातील पत्रकार यांनी चक्क या महिला आंदोलकांचे बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू केलेले आहे.

संगीता फोगाट आणि विनेश फोगाट यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एक फोटो व्हायरल झालेला असून त्यामध्ये त्या हसताना दिसत आहेत. आंदोलन करण्यासाठी आंदोलक गंभीर नव्हते त्यांना केवळ मोदी यांच्या इव्हेंटमध्ये अडचण आणायची होती अशा आशयाचे कॅप्शन देऊन हे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत मात्र हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून बनवण्यात आल्याचा एक व्हिडिओ काँग्रेसने पत्रकार परिषदेत दाखवलेला आहे .

कुस्तीगीरांचे आंदोलन अद्यापदेखील संपलेले नसून त्यांच्या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटीचा देखील पाठिंबा मिळत आहे. उर्फी जावेद हिने देखील या प्रकरणावर अखेर भाष्य केलेले असून झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केलेला आहे. उर्फी जावेदने ट्विट करत ‘ लोक स्वतःच खोटं पटवून देण्यासाठी अशा फोटोसोबत इतकी छेडछाड करतात . एखाद्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी योग्य नव्हे ‘, असे देखील उर्फी जावेदने ठणकावले आहे.

बजरंग पुनिया याने देखील हा फोटो शेअर केलेला होता. आयटी सेलचे लोक हे खोटे फोटो पसरवत आहेत. ज्याने हा फोटो एडिट करून पोस्ट केलेला आहे त्याच्याविरोधात कारवाई होईल असे कुस्तीगीरांनी सांगितलेले असले तरी कारवाई कोण आणि कशी करणार हे देखील प्रश्नचिन्ह आहे . उर्फी जावेद हिच्या पाठोपाठ कमल हसन , पूजा भट , विद्युत जामवाल आणि मराठमोळी वनिता खरात यांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे.


शेअर करा