मोठी बातमी..अहमदनगरचे नामांतर ‘ अहिल्यानगर ‘ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

शेअर करा

अहमदनगर जिल्ह्याचे नाव लवकरच बदलण्यात येणार असून त्या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 298 वी जयंती साजरी होत असताना शिंदे यांनी ही घोषणा केलेली आहे. आगामी काळात अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाईल असे देखील शिंदे पुढे म्हणाले .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की , ‘ अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करणार येण्यात येणार असून असे नामांतर करण्याचा निर्णय आमच्या काळात होत आहे हे आमचे भाग्य आहे. नामांतर झाल्यानंतर नगर जिल्ह्याचा मान देखील हिमालय एवढा होणार आहे ‘.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की , ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलेले आहे त्यामुळे आम्ही आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झालेलो आहोत हे आमचे भाग्य आहे. ज्या लोकांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही वीस दिवसात सत्तेतून घालवण्याचे काम केलेले आहे .’

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर उस्मानाबाद आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्याचे नामांतर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या आधी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी सत्ता सोडत असताना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे केलेले होते मात्र शिंदे यांनी त्यास ‘ छत्रपती ‘ शब्द जोडत औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केलेले आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे देखील नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितलेले आहे .

राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रोहिदास लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार तसेच जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, शिवसेना आणि भाजपाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.


शेअर करा