पुणे हादरले ..तलावात १६ वर्षीय मुलीच्या चपला तरंगताना आढळल्याने ‘ आत्महत्या की अपघात ? ‘

  • by

पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या पाणी साठवण तलावात एका 16 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही आत्महत्या आहे ही अपघात आहे, याबाबत परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा मंगल पवार असे या मुलीचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ सोनू मंगल पवार ( राहणार सोमेश्वर इंजिनिअरिंग महाविद्यालय वाघळवाडी मूळ राहणार फुलउमरी, वाशिम ) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवार कुटुंब राजू हिरा सिंह जाधव यांच्याकडे बिगारी म्हणून कामास आहे. सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे वाघळवाडी येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे बिल्डिंगचे काम सुरू आहे. तिथे सर्व जण मजुरीचे काम करुन तिथेच राहतात.

मयत तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे वाघळवाडी येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे बिल्डिंगचे कामासाठी मजूर कामाला आले होते. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आम्ही तिघे जेवण करण्यासाठी गेलो. जेवण झाल्यानंतर परत तिघेजण दुपारी कामावर आलो त्यावेळी दोन्ही बहिणी पूजा आणि उमा या घरी होत्या.

दुपारी तीनच्या सुमारास माझी लहान बहीण उमा ही कामावर आली. तिने सांगितले की, दीदी अडीच वाजण्याच्या सुमारास बाथरूमला गेली होती मात्र अजून ती घरी आली नाही. त्यानंतर घरी जाऊन कामाच्या तसेच राहत असलेल्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात आम्ही शोध घेतला मात्र बहीण पूजा हिच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही.

गुरुवार दिनांक 1 रोजी पूजा हिचा बाथरूमला गेलेल्या बाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला. सकाळी अकराच्या सुमारास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पाणी साठवण्याच्या तलावातील पाण्यात बहीण पूजा तिच्या चपला तरंगताना दिसल्या. त्यानंतर इतरांच्या मदतीने तळ्यातील पाण्यात तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असे फिर्यादीने नमूद केले आहे. ही आत्महत्या की अपघात याबद्दल तपास सुरू असून पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र फणसे प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.