अहो..बाहेर तुम्हाला कोणतरी बोलावतंय ? मात्र मुनीम निघाला ‘ त्यांच्या ‘ पण पुढचा : काय केले नक्की ?

शेअर करा

बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या मुनीमाला बाहेर बोलावून लुटण्याचा प्रयत्न मुनीम हुशार असल्याने फसला असल्याची घटना नांदेड येथे घडली आहे. मुनीमाने आणलेले पैसे कॅशियरकडे ठेवून बँकेबाहेर पोहचल्याने चोरट्यांकडून मुनीम यास लुटण्याचा प्रयत्न फसला आहे.

शहरातील अनेक व्यापारी आणि बडे व्यवसायिक यांचे बँकेत दररोज लाखो रुपयांचे व्यवहार असतात त्यासाठी ते मुनीम किंवा स्वतःहून बँकेत पैसे भरतात किंवा काढतात त्यामुळे अशा लोकांवर चोरट्यांची नजर असते. यापूर्वी देखील बँकेबाहेर किंवा बँकेत अशा लोकांचे लक्ष विचलित करून पैसे चोरण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. शनिवारी देखील असाच एक प्रकार घडला असता मात्र मुनीम यांनी प्रसंगावधान राखत हुशारी वापरल्याने अनर्थ टळला.

नरसी येथील एका किराणा स्टोरची रक्कम भरण्यासाठी मुनीम शंकर नागरी सहकारी बँकेत आले होते यावेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने बाहेर कोणीतरी व्यक्ती तुम्हाला बोलवत आहे असा निरोप दिला परंतु मुनीम यांना त्या व्यक्तीचा संशय आल्याने त्यांनी ‘ मी तुम्हाला ओळखत नाही मला कोण बोलणार आहे ‘ असे म्हणून दुर्लक्ष केले परंतु त्या व्यक्तीने एक वेळेस बाहेर तरी या असा तगादा लावला त्यानंतर मुनीम यांनी हुशारी दाखवत आपल्याकडील पैशाची बॅग हि कॅशियरकडे दिली आणि ते बँकेबाहेर आले.

बँकेबाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची बॅग न दिसल्याने त्यांना निरोप देणारा आणि बाहेर उभा असणारा दोघेही पसार झाले त्यामुळे हे भामटे आपल्याला लुटण्यासाठी आले होते असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचार्‍यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या आहेत.


शेअर करा