एक बनावट नोट कटवली की मिळायचे ‘ इतके ‘ रुपये म्हणून झाला एका पायावर तयार

शेअर करा

लॉकडाऊनमुळे पैशाची चणचण भासू लागल्याने त्याने घरातच नोटा छापायला सुरु केले होते. छापलेल्या बनावट नोटा मधील हजार रुपये खपवले की त्यातील पाचशे रुपये मला आणून द्यायचे असा व्यवहार दोन मित्रांमध्ये ठरला होता. अशाप्रकारे किती नोटा खपवल्या याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.

लॉकडाऊनमुळे पैशाची चणचण भासू लागली होती त्यामुळे हे पैसे घरातच तयार करायचे आणि बाजारात कटवायचे, अशी शक्कल लढवत विष्णू सिद्राम गायधनकर ( वय 35 भारत हौसिंग सोसायटी मौलाली चौक सोलापूर शहर ) याने युट्युब वरून बनावट नोटा कशा छापायच्या याची माहिती घेतली. त्यानंतर त्याने प्रथम कलर प्रिंटिंग मशीन खरेदी केली या मशीनवर साध्या कागदाचा वापर करून हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा त्यांनी तयार केल्या.

नोटा तयार केल्यानंतर नोटा खपवण्यासाठी त्याला एका विश्वासाच्या माणसाची गरज होती त्यामुळे त्यांनी त्याचा बालमित्र असलेल्या संजय धनु पवार ( वय 35 राहणार कुमठा तांडा उत्तर सोलापूर ) याला बोलावून घेतले. चहाच्या कॅन्टीनवर गप्पा मारत विष्णू याने आपला प्लॅन संजय पवार यास सांगितला. या नोटा बाजारात कटवशील तर त्यातील अर्धे पैसे मला दे आणि अर्धे तू घे असा करार दोघांमध्ये ठरला.

संजय पवार हा लगेच त्यासाठी तयार झाला त्याने मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांकडे सुरुवातीला प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला त्यानंतर त्याची हिंमत वाढली आणि दुसऱ्यांदा देखील तो भाजी मार्केटमध्ये बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दाखल झाला मात्र पोलिसांनी त्याला पकडले या दोघांनाही पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.


शेअर करा