महाराष्ट्र की बिहार ? तरुणी दुचाकीवर भावासोबत चालली असताना कोयत्याचा धाक दाखवून गुंडाने केले अपहरण

शेअर करा

सीईटीची परीक्षा देऊन चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मूळ गावी परतत असताना एकोणीस वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची घटना धक्कादायक घटना पुण्यानजीक लोणीकाळभोर परिसरातील दिवेघाटात घडली आहे. एक दुचाकी आणि एका चारचाकी मधून आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून युवतीचे अपहरण केले असून यातील एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

सदर तरुणीच्या वीस वर्षीय भावाने दिलेल्या तक्रारीवरून, अनिस पठाण व त्याचे दोन मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणीचे मूळ गाव पुरंदर असून तिचे वडील पुणे येथील एका शासकीय कंपनीत कामात असल्याने ते पत्नी, मुलगा आणि अपहृत मुलगी यांच्यासोबत फुरसुंगी ( तालुका हवेली) परिसरातील एका गावात वास्तव्यास आहेत

अपहृत तरुणीची सीईटी परीक्षा पुणे येथे असल्याने चुलत भावाने तिला 30 सप्टेंबर रोजी तिचे वडिलांकडे आणून सोडले होते. 2 ऑक्टोबर रोजी तिने पेपर दिला त्यानंतर शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघे बहिण-भाऊ दुचाकीवरून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी हडपसर – सासवड रोडने निघाले. दुचाकीवर जात असताना एका स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीस रोडच्या कडेने दाबण्यास सुरुवात केली. दुचाकी रोडच्या कडेला येतात चालकाने त्याची गाडी दुचाकीला आडवी मारली त्यामुळे भावाला दुचाकी थांबवावी लागली.

दोघे बहीण भाऊ थांबलेले पाहताच पाठीमागून एका दुचाकीवर अनिस पठाण हा आला आणि त्याने त्याच्या शर्टाच्या मागील बाजूस लपवलेला कोयता काढून मुलीच्या भावाच्या हातावर व पायावर मारला आणि त्याच्या बहिणीला बळजबरीने ओढून घेऊन जाऊ लागला. भावाने विरोध केला असता स्विफ्टमधून एक इसम उतरला आणि त्याने देखील भावाला मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनेक पठाण याने ‘ मला हिच्या सोबत लग्न करायचे आहे तू मध्ये पडू नकोस ‘ असे म्हणून तरुणीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि हडपसर बाजूकडे निघून गेला. त्याच्यापाठोपाठ स्विफ्ट गाडी देखील हडपसर बाजूला निघून गेली. त्यानंतर भावाने झालेल्या प्रकाराबद्दल मुलीच्या घरी फोन केला आणि सदर प्रकाराची पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली

सुमारे एक वर्षापूर्वी अनिस पठाण याने सदर तरुणीवर बळजबरीने बलात्कार केला होता याबाबत त्याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. त्यानंतरही अनिस पठाण हा वारंवार तिचा पाठलाग करून त्रास देत असल्याने सुमारे चार महिन्यांपूर्वी चुलत भावाने तिला आपल्या गावी गेले होते. तिथेदेखील 14 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता सर्वजण घरी असताना पठाण याने मित्रांसोबत तिथे जाऊन सर्वांना मारहाण केली होती. जेजुरी पोलीस ठाण्यात हा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेअर करा