प्रेयसीच्या घरात रंगेहाथ पती सापडल्यावर बायकोने बाहेर ओढून धू धू धुतला : कुठे घडला प्रकार ?

  • by

बऱ्याच दिवसापासून पत्नीचे त्याच्यावर लक्ष होते मात्र त्याला रंगेहाथ धरून चोप देण्याची पत्नी प्लॅनिंग करीत होती आणि अखेर ती वेळ आली. महिलेला पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला होता. त्यात त्याचा पाठलाग करताना तिही त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचली. तिने पतीची कॉलर पकडून त्याला रस्त्यावर आणलं आणि धू धू धुतला. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पीलीभीतमध्ये भररस्त्यात आपल्या पतीला बेदम मारत असताना लोकदेखील मध्ये पडले नाहीत उलट त्यांनी व्हिडीओ शूट करून हा व्हिडीओ व्हायरल केला. महिलेचा पती गेल्या अनेक दिवसांपासून प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी ये-जा करीत होता. त्याचा पाठलाग करीत शुक्रवारी त्याची पत्नीही पीलीभीतला पोहोचली आणि आपल्या आरोपी पत्नीला प्रेयसीच्या घरातून खेचून बाहेर काढलं. भररस्त्यात त्याला मारहाण सुरू केली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचं लग्न 10 वर्षांपूर्वी लखनऊ इथे राहणाऱ्या तिच्या पतीसोबत झालं होतं. जो तिला मारहाण करीत होता व जीवे मारण्याची धमकी देत होता. या घटनेनंतर पीडिता दोन ते तीन दिवसांपूर्वी पीलीभीतमध्ये आपल्या माहेरी आली. त्यानंतर तिचा पती तिथेच एका शासकीय कर्मचारी असलेल्या महिलेच्या घरी येत असल्याची तिला माहिती मिळाली आणि त्यानंतर तिने प्लॅन रचला.