सुफी म्हणाली ‘ हा माझा भाऊ ‘ अन पीडित तरुणीने ठेवला विश्वास मात्र ‘ असा ‘ होता ट्रॅप की ?

  • by

लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याची क्लिप बनवून सदर तरुणीस ब्लॅकमेल करायला सुरु केले. मात्र त्याच्या सातत्याच्या ब्लॅकमेलला वैतागून पीडित महिलेने आरोपी आणि त्याच्या दुसऱ्या महिला मैत्रिणीच्या विरोधात कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपी प्रवीण जयपाल यादव ( लखनऊ उत्तर प्रदेश ) तसेच त्याची दुसरी महिला मित्र सुफी विश्वकर्मा ( नेपाळ ) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मूळची नेपाळची असलेली ही 22 वर्षीय पीडित तरुणी 2018 मध्ये रोजगाराच्या निमित्ताने दिल्लीला आली होती. नेपाळमधील सुफी या तरुणीसोबत तिची मैत्री झाली. या मैत्रिणीने तिला सुरतला नेले त्यानंतर तेथील हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून सदर तरुणी काम करू लागली. सुफीने आरोपी प्रवीणला आपला भाऊ असल्याचे सांगून त्याच्या सोबत पीडित तरुणीची ओळख करून दिली.

2020 मध्ये सुफी आणि पीडित तरुणी लखनऊला पोहोचल्या. तिथे आरोपी प्रवीण याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सलगी वाढवली आणि सुफी हिने तिच्या जवळचे दीड लाख रुपये आणि तिचे दोन्ही मोबाईल काढून घेतले. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार असल्यामुळे पीडितेने आपली रक्कम आणि मोबाईल मागितला असता सुफीने देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे तरुणीने ही गोष्ट आरोपी प्रवीणला सांगितली.

प्रवीण याने तिला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. या शरीरसंबंधाची अश्लील क्लिप त्यांनी बनवली आणि ती व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करू लागला. त्यानंतर सुफी आणि प्रवीण या दोघांनी षडयंत्र करून आपल्याला फसवल्याचे त्यामुळे तरुणीच्या लक्षात आले आणि तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.