अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईवडील तिला दवाखान्यात घेऊन गेले असताना चक्क ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळल्याने आईवडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली असून 26 वर्षे चुलत भावाने आपल्या सतरा वर्षे चुलत बहिणीवर सातत्याने अत्याचार केले. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार तिच्या चुलत भावाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना असून चुलत भावाला अटक करण्यात आली आहे .पीडित 17 वर्षे मुलगी आपले आई वडील व भावासोबत शहरात राहते. तीन महिन्यापूर्वी कोणीही घरी नसताना पीडितेचा चुलत भाऊ हा तिच्या घरी आला आणि ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणालाही काही न सांगण्याची त्याने तिला धमकी दिली तसेच वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले.
काही दिवसानंतर मुलीचे पोट दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला शहरातील एका खासगी दवाखान्यात नेले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेले त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तिला प्रवरा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तिथे गेल्यानंतर मुलीची सोनोग्राफी केली असता मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आले. मुलीची अधिक चौकशी केली असता मुलींने दिलेल्या जबाबावरून तिच्या चुलत भावाला पोलिसांनी अटक केली. त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे हे तपास करत आहेत