मुंबई पोलिसांविरोधात अगदी ठरवून रचले ‘ असे ‘ कारस्थान, त्या अकाऊंट्सचा घेणार शोध : काय हे प्रकार ?

शेअर करा

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी आलेल्या एम्सच्या अहवालानंतर गोदी मीडियाचा पूर्णपणे पर्दाफाश झालेला असून गोदी मिडीयाने या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्यापलीकडे काही केले नाही, मात्र यासोबतच मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी कित्येक फेक अकाउंट बनवण्यात आले हे देखील स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी सोमवारी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू होता मात्र काही जणांनी पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. संबंधित माध्यम संस्थांसह समाज माध्यमांवरील बनावट अकाऊंट देखील तपास आता सुरू करण्यात आला आहे

परमविर सिंह म्हणाले, ” सुशांत आत्महत्यानंतर दोन दिवसांनी त्याचे वडील,बहिणी यांचे जबाब आम्ही नोंदवले. त्यांनी सुद्धा कुणाविषयी देखील संशय व्यक्त केला नाही, मात्र काही दिवसांनी त्यांनी बिहार पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सुशांतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला पण ही हत्याच असून सरकारी दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा देखील ठपका पोलिसांवर ठेवण्यात आला. अहवालात मात्र त्याच्या शरीरात विषाचा अंश किंवा घातपात झाल्याचा कुठलाही निष्कर्ष निघाला नाही आणि ती आत्महत्या असल्याचेच स्पष्ट झाले. आश्चर्य व्यक्त करण्यासारखे यात काहीच नव्हते कारण आमचा तपास योग्य दिशेने सुरू होता.

मुंबई पोलिसांविरोधात अगदी ठरवून ही मोहीम राबवली गेली त्यातून मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा देखील प्रयत्न झाला. त्यासाठी बनावट अकाउंटचा वापर करून मोठ्या प्रमाणात शिवीगाळ देखील करण्यात आली. काही प्रसारमाध्यमे आणि संस्था यांच्याकडूनही पोलिसांवर आरोप करण्यात आले या आरोपाच्या मागे नेमके कोण आहे याचा शोध घेत आहोत यासाठी उच्च न्यायालयात देखील धाव घेणार आहोत, असे देखील परमविर सिंह यांनी स्पष्ट केले .दरम्यान बनावट अकाऊंटद्वारे राज्य सरकारची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले असून मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्यांचे बुरे दिन आता सुरू होणार हे निश्चित.


शेअर करा