पुणे हादरले..पोलीस आयुक्तालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

शेअर करा

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण भयानक वाढले आहे .भरदिवसा पोलीस आयुक्तालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेट बँक समोरील फुटपाथवर थांबलेल्या बांधकाम व्यवसायिकाची गोळ्या झाडून खून केल्याची घटना पुणे शहरात घडली आहे. राजेश हरिदास कानाबार ( वय 63 रा. घोरपडी) असे बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहे. घटना काल दुपारी तीनच्या आसपास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश व्यवसायिक असून त्यांचा बांधकाम व इमारत सुशोभीकरणाचा व्यवसाय आहे. बावधन येथे त्यांची दहा एकर जमीन आहे. या जमिनीबाबत त्यांचे काही जणांबरोबर काही वर्षांपासून वाद सुरू आहे. जमिनीच्या वादाचे हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सोमवारी सुनावणी होणार होती त्यासाठी ते दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील काम संपल्यावर ते दुपारी पावणेतीन वाजता बाहेर आले . शासकीय कोषागारात जवळ लावलेल्या आपल्या गाडीकडे जात होते. जवळच्या फळ विक्रेत्यांकडून त्यांनी काही फळे घेतली त्याच वेळी दोन जणांनी त्यांना अडवले आणि त्यातील एकाने गोळी झाडली. गोळी झाल्यानंतर हल्लेखोर फरार झाले मात्र चालकाच्या हा प्रकार लक्षात आला त्याने त्यांना गाडीत बसून खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता

प्राथमिक अंदाजानुसार राजेश यांचा खून जमिनीच्या वादातून झाल्याची शक्यता आहे. दरम्यान या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची पथके रवाना झाले आहेत. चालकाच्या म्हणण्यानुसार गोळीबार करणाऱ्यांमध्ये दोन व्यक्तींचा सहभाग आहे. दीपक मारटकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे खराडी भागातदेखील एका सराईत गुन्हेगाराचा खून झाला होता. गेल्या काही दिवसात पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून प्रशासनासाठी ही चिंतेची बाब बनली आहे


शेअर करा