…. अन मित्राच्या घरातून तरुण पळतच पोहचला पोलीस स्टेशनला : ‘ घडला असा प्रकार ? ‘

शेअर करा

आपल्या जुन्या मित्राचा खूप दिवसांनी संपर्क झाल्याने तो तरुण आनंदात होता. अशात मित्राने त्याला घरी बोलावले मात्र त्याच्या मित्राचा प्लॅन भलताच होता. जुन्या ओळखीचा फायदा घेऊन तरुणाला हनी ट्रॅपमध्ये फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जुन्या ओळखीचा फायदा घेत सदर तरुणाला घरी बोलावण्यात आले त्यानंतर ही घटना घडली. नागपुरातील नंदनवन परिसरात ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नागपूरच्या नंदनवन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपली जुनी ओळख असलेल्या तरुणाला प्लॅन करुन घरी बोलावलं. तो घरी पोहचताच या तरुणाच्या पत्नीने घरी आलेल्या मित्रासोबत सलगी करायला सुरुवात केली. ठरल्या प्रमाणे तिचा पती आपल्या दोन मित्रांसोबत तिथे पोहचला त्यानंतर त्या तरुणाचे अर्ध नग्न फोटो काढले तसेच त्याला मारहाण करत त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप करु लागले.

पोलिसात जायचं नसेल, तर एक लाख रुपये देण्याची मागणी केली. त्याच्या जवळ असलेले पैसे हिसकावून घेतले. इतकंच नाही तर चाकुच्या धाकावर त्याला एटीएममध्ये नेलं आणि त्याच्याकडून 13 हजार रुपये काढून घेतले. इतकंच नाही तर अश्लील फोटो वायरल करण्याची धमकीही तरुणाला दिली. आपल्यासोबत झालेला हा प्रकार पाहून तरुण घाबरला अन त्यांच्या तावडीतून सुटताच त्याने थेट नंदनवन पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीसह तिघांना अटक केली.


शेअर करा