महाराष्ट्र सरकारची देखील नवीन नियमावली जाहीर .. पहा काय सुरु काय बंद ?

शेअर करा

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनंही आपली नियमावली प्रसिद्ध केली आहे. ५ जूनपासून सगळे बाजार, बाजार परिसर, दुकानं सुरू होणार आहेत, पण मॉल्स आणि बाजार संकुलं याला अपवाद असतील. सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले जाणार आहेत. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.

काय राहणार राज्यातील परिस्थिती ?

  • राज्यात धार्मिक आणि उपासना स्थळे, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत.
  • हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत.
  • राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी
  • सार्वजनिक मैदानेही खुली केली जाणार
  • समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही मान्यता
  • ८ जूनपासून सर्व खासगी कार्यालये आवश्यकतेनुसार १०% पर्यंत कर्मचाऱ्यांसह सुरू करता येतील आणि उर्वरित व्यक्ती घरून काम करू शकतील.

राज्यात हे बंदच राहणार

  • शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, ट्रेनिंग आणि कोचिंग क्लासेस
  • आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक ( महाराष्ट्र सरकारची परवानगी असल्यास मुभा)
  • मेट्रो रेल्वे
  • रेल्वेचा राज्यांतर्गत प्रवास आणि राज्यांतर्गत हवाई वाहतूक ( सरकारने परवानगी दिली असल्यास मुभा )
  • सिनेमा हॉल, जीम, स्वीमींग पूल, मनोरंजन गार्डन, थेअटर, बार आणि संग्रहालय, विधानभवन व तत्सम ठिकाणं
  • सामाजिक, राजकीय, क्रीडात्मक, मनोरंजनात्मक, सांस्कृतिक, धार्मिक कार्य आणि मोठे सोहळे
  • धार्मिक प्रार्थना स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळं
  • बार्बर शॉप, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर
  • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवेची ठिकाणं

दरम्यान, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशी काम करणाऱ्या तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून काम करावे लागणार आहेत. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्तीसाठी न्यावे लागणार आहे. जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास मोकळ्या मैदानात जाण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन बंधनकारक असणार आहे.

संबंधित बातम्या

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतलाय योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=154

लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल
https://nagarchaufer.com/?p=142

देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्राकडून २८ हजार कोटींच्या दाव्याची महाविकास आघाडीकडून पोलखोल : पॉईंट टू पॉईंट
https://nagarchaufer.com/?p=177

सुजय विखे यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=181

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची पोलखोल करताच भाजपचा थयथयाट सुरु, कोणी केले तब्बल आठ ट्विट्स ?
https://nagarchaufer.com/?p=188


शेअर करा