घटस्फोटित मैत्रिणीशी शारीरिक संबंध मात्र गर्भवती होताच मारल्या पोटावर लाथा : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

घटस्फोटित मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता मात्र पुढे ती मैत्रीण गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात ही घटना घडली असून अजित अशोक कुलकर्णी ( मूळ राहणार सांगली जिल्हा, हल्ली राहणार सिडको ) याला अटक केली आहे.

विशेष म्हणजे पीडित महिला आणि आरोपी हे दोघेही बालपणापासून वर्गमित्र आहेत. घटस्फोटित पीडितेला घेऊन अजित सिडकोतील त्याच्या आतेभावाच्या घरी आला त्यानंतर तिथे दोन महिने एकत्र राहात त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोन महिन्यानंतर हे दोघेही सोलापूरला गेले आणि तिथेही काही काळ राहिले.

सोलापूरवरून परतल्यानंतर ते पुन्हा औरंगाबादला आले आणि एकत्र राहू लागले. याच दरम्यान जुलै 2020 मध्ये ती गर्भवती असल्याचे समजताच अजित याने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या त्यानंतर पुन्हा एकदा ती गर्भवती असल्याचे समजताच त्याने तिच्यासोबत भांडण केले आणि चार सप्टेंबर रोजी तिच्या पोटावर लाथा मारल्या त्यानंतर तिचा गर्भपात झाला. या घटनेनंतर तिने त्याच्याविरुद्ध उमदी ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्हा औरंगाबादला वर्ग होताच अजितला अटक करण्यात आली असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


शेअर करा