दोन विषयांच्या क्लास दरम्यान ‘ रिकामा वेळ ‘ सापडताच शिक्षक म्हणायचा की …. ?

शेअर करा

खाजगी क्लासेससाठी येणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिला ब्लॅकमेल करणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या एका शिक्षकाला नवी मुंबई येथील कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे गेल्यावर्षी त्याने या विद्यार्थीनीवर अत्याचार केल्यानंतर लॉकडाऊन लागल्यापासून तो तिला सातत्याने ब्लॅकमेल करून धमकावत होता त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

संजय भालचंदानी असे या अटक केलेल्या शिक्षकांचे नाव असून त्याचे वाशी येथे कोचिंग सेंटर आहे. त्याच्या क्लासमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी सोबत त्याने गैरकृत्य केले होते. संजय भालचंदानी याच्याकडील क्लास संपल्यानंतर ही विद्यार्थिनी दुसऱ्या क्लासमध्ये जायची दोन्ही क्लासच्या मधल्या रिकाम्या वेळेत अधिक अभ्यास घेतो असे सांगून तो विद्यार्थिनीला कोपरखैरणे येथील घरी घेऊन गेला होता. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार करून ही गोष्ट कोणाला न सांगण्याची धमकी दिली होती त्यामुळे त्या मुलीने याबद्दल मौन बाळगले होते. महिन्याभरात त्याने पुन्हा एकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचा क्लासचा संपर्क तुटला होता परंतु लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शिक्षकाने पीडित मुलीला ब्लॅकमेल करून पुन्हा धमकावले. शिक्षकाकडून वाढत असलेल्या अत्याचाराला आणि ब्लॅकमेलला कंटाळून विद्यार्थिनींने घडल्या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. याचा जाब विचारण्यासाठी पीडित तरुणीचे वडील आणि आई त्याच्याकडे गेले असता त्याने मित्रांच्या मदतीने त्यांना हाकलून दिले. त्यानंतर झाल्या प्रकाराची पोलिसात फिर्याद देण्यात आली.


शेअर करा