महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना नागपूर जिल्ह्यात समोर आलेली असून वारकरी संप्रदायातील एका व्यक्तीने स्वतःचे सरण रचून त्यानंतर त्यात उडी घेत आत्महत्या केलेली आहे. पहाटे शेतात जाऊन त्यांनी एका बाजूला स्वतःचे सरण रचले आणि त्यानंतर ते पेटवून त्यात उडी घेतली. त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही गावात राहणाऱ्या आत्माराम मोतीराम ठक्कर नावाच्या व्यक्तीने हा प्रकार केलेला असून पहाटे पाच वाजता ते शेताकडे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी लाकडी सरण रचले आणि त्यानंतर पेटवून देत त्यात उडी घेतली. अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्यांचे पार्थिव गावकऱ्यांना मिळाले आणि ही घटना समोर आली.
आत्माराम ठक्कर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी पानाचा एक विडा आणि एक दिवाआढळून आलेला असल्याकारणाने परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. वेलतूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली असून आत्माराम हे वारकरी संप्रदायातील धार्मिक वृत्तीचे होते गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्याकारणाने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची देखील परिसरात चर्चा आहे.