ऑनलाईन डेटिंगसाठी मुली मागवण्याची खोड ज्येष्ठ नागरिकाला पडली ‘ लई भारी ‘ ? : कुठे घडला प्रकार ?

  • by

‘ पिकल्या पानाचा देठ का हो हिरवा ‘ असे म्हणतात ते काही उगाच नाही. पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची डेटिंगची ऊर्मी जागृत झाली आणि तब्बल पावणेचार लाखांचा फटका बसला.सदर नागरिकाचे वय 68 वर्षे असून त्यांना डेटिंगसाठी मुली मागवणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढून पावणे चार लाखाची टोपी टाकली. ( A senior citizen of Pune was cheated by showing the lure of giving girls for dating )

उपलब्ध माहितीनुसार, क्वार्टर गेट इथे राहणाऱ्या 68 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार 31 जुलै पासून सुरु होता फिर्यादी हे घरी असताना त्यांना एक फोन आला आणि त्यांना डेटिंग साठी मुली पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले आणि त्यासाठी एका साइटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडली.

रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना एका बँक खात्यात पैसे देखील जमा करण्यास सांगण्यात आले. काही रक्कम त्यांनी जमा केल्यानंतर त्यांना दुसऱ्या मोबाईल वरून पुन्हा एकदा फोन करण्यात आला त्यात तुम्ही आता रजिस्ट्रेशन केले असल्याने तुमच्यावर पोलीस गुन्हा दाखल करतील अशी भीती दाखवण्यात आली.

‘ आता जर हे रजिस्ट्रेशन रद्द करायचे असेल तर आणखी पैसे द्या ‘ असे सांगत त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 74 हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले. इतके पैसे देऊन देखील आरोपीचे समाधान होत नव्हते त्यानंतरही आणखी पैशाची मागणी केली जाऊ लागली तेव्हा फिर्यादीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर हा गुन्हा समर्थ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे