चांद्रयान तीनचे लॉन्चपॅड बनवलं , आता रस्त्यावर इडली विकायची वेळ

शेअर करा

चांद्रयान तीन मोहीमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली मात्र दुसरीकडे रांची येथील हेवी इंजिनिअरिंग कार्पोरेशनच्या अर्थात एचइसी अभियंत्यांना अद्यापही पगार मिळालेला नाही. याच कंपनीतील अभियंत्यांनी चांद्रयानसोबत इतर मोहिमेंमध्ये वापरण्यात आलेले लॉन्चपॅड तयार केलेले असून सरकारी नोकरी असून देखील 18 महिन्यांपासून वेतन मिळाले नाही म्हणून एका अभियंत्याला रस्त्यावर उभे राहून इडली विकण्याची वेळ आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , दीपक कुमार असे कंपनीत एचइसी कंपनीत काम करणाऱ्या या अभियंत्याचे नाव असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे . इडली विकून सध्या ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून गेल्या 18 महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. तब्बल 28 कर्मचाऱ्यांची अशीच परिस्थिती असून त्यांची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे.

झारखंडची राजधानी असलेल्या रांची मधील ध्रुवा परिसरात जुन्या विधानसभेसमोर दीपक यांचे लहानसे दुकान आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ते तिथे इडली विकत आहेत. सकाळी इडली विकून ते कामाला जातात आणि संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पुन्हा इडली विकतात आणि मग घरी जातात . अनेक जणांनी उधारी देणे देखील आता बंद केलेले आहे त्यामुळे पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याची कुटुंबावर वेळ आलेली आहे. दिवसाला 300 ते 400 रुपयांची इडली विकून कसेबसे 50 ते 100 रुपये सुटतात आणि त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो असे दीपक यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा