भारत चंद्रावर पोहोचला अन पाकिस्तान भीक मागतोय , नवाज शरीफ यांची कबुली

शेअर करा

पाकिस्तानवर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट घोंगावत असून माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देशाची हतबल परिस्थिती मंगळवारी पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे. ‘ आपला शेजारी देश असलेला भारत चंद्रावर पोहोचला आहे आणि पाकिस्तान जगापुढे पैशाची भीक मागत आहे ‘ अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली हतबलता व्यक्त केलेली असून भारताने जी 20 शिखर परिषदेचे आयोजन केले तर पाकिस्तान मात्र वेगवेगळ्या आर्थिक घोटाळ्यात अडकलेला आहे. देशाच्या अशा दुर्दशेसाठी माजी लष्कर प्रमुख आणि न्यायाधीश जबाबदार असल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे.

नवाज शरीफ यावेळी म्हणाले की , ‘ पाकिस्तानची अर्थव्यवस्था मागील अनेक वर्षांपासून डबघाईला आलेली आहे त्यामुळे महागाईचा आकडा दुपटीने वाढलेला असून सर्वसामान्य जनता यामध्ये भरडली जात आहे अशा बिकट परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान देशोदेशी जाऊन निधीची भिक मागत आहेत तर दुसरीकडे भारताने मात्र चंद्रावर जाण्याची किमया साध्य केलेली आहे. जे पराक्रम भारत करू शकला ते पाकिस्तान का करू शकला नाही ? याला जबाबदार कोण आहे ? ‘, असा देखील प्रश्न त्यांनी विचारलेला आहे.

नवाज शरीफ पुढे म्हणाले की , ‘ अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले होते त्यावेळी भारताकडे फक्त एक अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी शिल्लक होती ही आता 600 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे तर पाकिस्तान मात्र अत्यंत खराब परिस्थितीत असून यासाठी जबाबदार कोण आहे ? ‘, असा देखील प्रश्न त्यांनी पुढे विचारलेला आहे.


शेअर करा