कसला अमृतकाल ? , श्रीमंत लोक चालले देश सोडून

शेअर करा

केंद्र सरकार कितीही अमृतकालाच्या घोषणा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र देशातील धनाढ्य आणि पैसेवाले व्यक्ती देश सोडून जात असल्याचे चित्र गेल्या काही वर्षात निर्माण झालेले आहे. ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात स्थायिक झालेली आहे त्याची मदत घेत त्या देशात जाऊन काम धंदा तसेच नोकरी शोधण्याचे प्रमाण वाढलेले असून बहुसंख्य सोडून जाणारे नागरिक हे गर्भश्रीमंत असून गेल्या काही वर्षात ही संख्या वाढलेली आहे.

एका अहवालातून संभाव्य आकडेवारी जाहीर करण्यात आलेली असून 2023 च्या वर्षअखेरीपर्यंत मोठ्या संख्येने भारतीय नागरिक इतर देशांमध्ये स्थायिक होत असून चीनमधील देखील अनेक नागरिक अमेरिका , कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांची वाट धरत आहेत. देश सोडून जाणाऱ्या नागरिकांमध्ये चीन प्रथम क्रमांकावर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बहुसंख्य श्रीमंत व्यक्ती हे अमेरिका , कॅनडा , ऑस्ट्रेलिया आणि दुबई तसेच सिंगापूरसारख्या देशांना प्राधान्य देत असून भारतातील करप्रणालीसोबतच दैनंदिन जीवनामध्ये येत असलेल्या अडचणी , आरोग्य सुव्यवस्था , चांगले शिक्षण आणि नोकरी तसेच व्यवसायाच्या संधी या भारतापेक्षा परदेशात जास्त प्रमाणात असल्याने हे नागरिक देश सोडून जात आहेत. अनेक नागरिकांमध्ये युरोपीय देशात जाण्याचे देखील प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले पाहायला मिळत आहे.


शेअर करा