बायकोला पळवून नेणारा प्रियकर ‘ अखेर ‘ पतीच्या ताब्यात सापडला आणि मग .. ?

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून पत्नीचे दुसऱ्या एकाबरोबर प्रेमसंबंध जुळले होते आणि काही काळानंतर पत्नीला घेऊन तिचा नवीन प्रियकर फरार झाला. या रागातून पतीने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात आभाळवाडी परिसरात घडली आहे. आभाळवाडी परिसरातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून दोन महिन्यापूर्वी विवाहितेला पळून गेल्याची नेल्याचा राग मनात धरून तिच्या पतीने प्रियकराचा अमानुषपणे काटा काढला. दोन दिवसापूर्वी गंगापूर धरणाच्या परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून तालुका शाखेच्या पथकाने व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

उपलब्ध माहितीनुसार,हरसुल येथे राहणारा नितीन टबाले याचा सावरगाव शिवारात गंगापूर धरणाच्या परिसरात पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेत मृतदेह आढळून आला होता. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Husband kills boyfriend who kidnapped wife near nashik )

तालुका पोलिस ठाण्याचे शिपाई विक्रम कडाळे यांना मयत नितीन याचे आभाळवाडी येथील एका विवाहित स्त्रीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती हाती लागली. नितीन हा मागील दोन महिन्यांपासून त्या विवाहित महिलेसोबतच सोबतच राहत होता आणि तिच्या पतीने त्याचा खून केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. संशयित अशोक मोरे यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता अशोक याने गुन्ह्याची कबुली दिली


शेअर करा