बारा हजारांचा विद्युत मीटर ग्राहकांच्या माथी , अडाणीवर मेहेरबानी कायम

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल क्रांती नावाखाली सरसकट कुठलाही बदल करण्याच्या नावाखाली ग्राहकांचा कुठलाही विचार होताना दिसत नसून अशातच राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चार खाजगी कंपन्यांना महावितरण कंपनीने दिलेले आहे. स्मार्ट मीटर नावाखाली तब्बल 12 हजार रुपयांचा मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यात येणार असून महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने यासंदर्भात संताप व्यक्त केलेला आहे .

तब्बल 12 हजार रुपयांचा मीटर जर बिघडला किंवा नादुरुस्त झाला तर हा भार ग्राहकांवरच टाकण्याचा कंपनीचा विचार आहे. सद्य परिस्थितीत देखील मीटर खराब झाला तर साधारण हजार ते पंधराशे रुपयांच्या दरम्यानचा मीटर ग्राहकाला पदरखर्चाने बसून घ्यावा लागतो. महावितरणकडे गेल्यानंतर आमच्याकडे मीटर उपलब्ध नाहीत असे कारण सांगण्यात येते आणि ग्राहकांना वीजमीटर पदर खर्चाने विकत घेऊन त्यानंतर बसवण्याची पावती फाडून तो घरात बसून घ्यावा लागतो. नवीन स्मार्ट मीटर आल्यानंतर जर तो बिघडला तर बारा हजार रुपयांचा खर्च करणार कोण ? असा सवाल सध्या नागरिक करत आहेत.

केंद्राच्या मेहरबानीने आणि आशीर्वादाने महावितरणने राज्यात अडाणी , एनसीसी , मोंटेकारला आणि जीनस या कंपन्यांना स्मार्टमीटरचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले असून बेस्टकडून याआधीच अडाणी समूहाला स्मार्ट मीटर बसवण्याचे काम देण्यात आलेले आहे. राजकीय क्षेत्रातून अडाणीवर दाखवण्यात आलेल्या मेहरबानीवर टीका होत असतानाच महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने स्मार्ट मीटरच्या किमतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असून ग्राहकांना हा वीज मीटर चांगलाच शॉक देणार आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सद्य परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या किमतीतील 60 टक्के वाटा केंद्र उचलणार असून 40% वाटा महावितरणला उचलायचा आहे आणि त्यात देखील महावितरणची परिस्थिती पाहता हा खर्च ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार असल्याची माहिती आहे.


शेअर करा