केंद्राकडून पुन्हा झटका , गॅसमध्ये एक ऑक्टोबरपासून तब्बल ‘ इतकी ‘ दरवाढ

शेअर करा

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून चार राज्यातील विधानसभा निवडणुका देखील तोंडावर आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना केंद्र सरकारकडून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा होती मात्र पुन्हा एकदा जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केंद्राकडून करण्यात आलेले असून एक ऑक्टोबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी साधारण दोनशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.

मुंबईत आता व्यावसायिक गॅसच्या सिलेंडरची किंमत ही 1684 पर्यंत पोहोचलेली असून चेन्नईमध्ये हीच किंमत तब्बल 1898 आहे. ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर शंभर रुपयांनी कमी झाला होता मात्र अवघ्या दोन महिन्यात पुन्हा एकदा दोनशे नऊ रुपयांची वाढ व्यावसायिक दरवाढ गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आलेली आहे.

व्यावसायिक सिलेंडरची किंमत वाढली असली तरी घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मात्र दरवाढ करण्यात आलेली नाही. व्यावसायिक गॅसच्या किमतीचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात मुख्यतः हॉटेल व्यवसायिकांना भोगावा लागणार आहे .


शेअर करा