प्रचारासाठी भाजप गाठतंय रोज खालची पातळी , राहुल गांधींना चक्क..

शेअर करा

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे असून या असून सत्ताधारी भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या घोषणांचे जमिनीवर कुठलेही परिणाम दिसून येत नाहीत त्यामुळे उलट नागरिकांच्या आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांसमोर सामोरे तरी कसे जायचे या विवंचनेत सध्या भाजप ग्रासलेला असल्याने प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षावर टीका करण्यात रोज आणखीन खालची पातळी भाजपच्या नेत्यांकडून गाठली जात आहे.

राजस्थान भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चक्क रावण स्वरूपात दाखवल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेस प्रचंड संतापलेली असून या कृत्याच्या विरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेतलेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आयटी विभागाच्या प्रभारी व्यक्तीच्या विरोधात जयपुर महानगर न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

भाजपने राहुल गांधी यांना चक्क रावण असल्याचे दाखवत एक पोस्टर जारी केले होते या पोस्टरमुळे आमचा अपमान झालेला आहे अशी टीका काँग्रेसचे राजस्थान प्रदेश महासचिव यशवंत गुज्जर यांनी केलेले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि आयटी विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांच्या विरोधात जयपुर महानगर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे . दोन्ही भाजप नेत्यांवर भारतीय दंड विधान कलम 499 , 500 , 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.


शेअर करा