काँग्रेसनं खेळलं ओबीसी कार्ड , सत्तेत येताच सर्वप्रथम हे काम करणार..

शेअर करा

भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कडवी टक्कर देऊ पाहत असून काँग्रेस पक्षाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये ‘ ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता येईल त्या राज्यात जातीय जनगणनेचे पाऊल उचलले जाईल आणि ही आकडेवारी सार्वजनिक केली जाईल ‘ असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलेले आहे. शासकीय संस्थांमध्ये दलित ओबीसी आणि आदिवासी समुदायाचे प्रतिनिधित्व नगण्य असल्याचे देखील त्यांनी सांगत जातीनिहाय जनगणनेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे असे म्हटलेले आहे.

नवी दिल्ली येथे काँग्रेस कार्यकारणी समितीची बैठक पार पडली त्या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की , देशाच्या भविष्यासाठी जातीय जनगणनेची गरज आहे हा केवळ राजकीय निर्णय नव्हे तर न्याय देणारा निर्णय असून जनगणना केल्यानंतरच विकासाचा नवा मार्ग आम्हाला गवसणार आहे . इंडिया आघाडीचे बहुतांश घटक पक्ष याबाबतीत सकारात्मक आहेत असे देखील ते पुढे म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की , ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे तिथे जातीय जनगणना केली जाईल. छत्तीसगड , राजस्थान आणि तेलंगाना राज्यात आम्हाला सत्ता मिळणार आहे तिथे देखील आम्ही हाच कित्ता गिरवणार आहोत. सध्या आमच्याकडे जातीय जनगणनेचा डाटा उपलब्ध नाही.सरकारने हा डेटा डाटा दिला नाही तर आम्ही सत्तेत आल्यानंतर जनगणना करून आकडेवारी सार्वजनिक करू, असे देखील ते म्हणाले . देशातील प्रमुख संस्थांमध्ये दलित आदिवासी आणि ओबीसींना योग्य ते प्रतिनिधित्व मिळायला हवे अशी देखील आपली भूमिका आहे असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा