प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ‘ ह्या ‘ शहरातून युवकाला उचलले : अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

शेअर करा

वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाला पुण्यात अटक करण्यात आली असून या तरुणावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूरज चव्हाण (वय 34) असं या तरुणाचं नाव असून तो कात्रज इथला रहिवासी आहे. ( Young man arrested from Pune in offensive Facebook post case against Prakash Ambedkar )

इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता मनोज क्षीरसागर यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर अत्यंत असभ्य भाषेत एका तरुणाने 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सूरज चव्हाणावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम आणि भारतीय दंड संहिता संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूरजला दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सूरजला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जहरी टीका केली होती. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचा नामोल्लेख न करता ‘एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्यांचं आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर. राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्रर्य वाटतं, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला होता. त्यांच्या या टीकेमुळे दोन्ही समाजातील तरुणांनी आंदोलने देखील केली होती.


शेअर करा