‘ माझ्यासोबत रात्रभर रहा नाहीतर मैत्रिणीला पाठव ‘, पोलीस अधिकाऱ्याचा महिलेला फोन

शेअर करा

पोलीस म्हटल्यानंतर अनेकदा नागरिकांना आपल्याला इथेच न्याय मिळेल असे वाटते मात्र काही प्रसंगात पोलीस देखील नागरिकांची अडवणूक करतात असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील बिजनोर इथे समोर आलेला असून नवऱ्याच्या विरोधात हुंडा , तिहेरी तलाक आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर महिलेला पोलिसाचा जो काही अनुभव आला तो अत्यंत भयावह असा होता. आजतकने याविषयी वृत्त दिलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , ‘ एका महिलेने तिच्या पतीच्या विरोधात हुंडा ट्रिपल तलाक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने जर तुम्हाला 376 सोबत आणखी गंभीर कलमे ठेवायचे असतील तर एक तर तुम्ही माझ्यासोबत रात्रभर रहा अन्यथा तुमच्या एखाद्या मैत्रिणीला माझ्याकडे घेऊन या , ‘ असे महिलेसोबत फोनवर संभाषण केलेले आहे. आरोपी पोलिस अधिकाऱ्याची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एसपींनी ऑडिओ क्लिप ताब्यात घेऊन या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलेले आहे.

धर्मेंद्र कुमार गौतम असे याप्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून या ऑडिओ क्लिप मधील आवाज त्याचाच असल्याचा दावा करण्यात येत आहे. महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये तिचा पती आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात तिने गुन्हा दाखल केलेला असून दिल्ली येथील एक युवक 31 मार्च 2022 पासून तर पाच जुलै 2023 पर्यंत या महिलेला मसुरी इथे घेऊन गेलेला होता . तिथे गेल्यानंतर त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आपण त्याला विरोध केला मात्र तरी देखील त्याने माफी मागत आपल्यासोबत विवाहाचे आश्वासन दिले आणि त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये विवाहदेखील केला मात्र काही दिवसांनी पतीचा दुसरीकडेच विवाह झालेला असल्याचे आपल्या लक्षात आल्यानंतर अखेर पती आपल्याला सोडून सौदी अरेबियाला निघून गेला आणि तिथूनच त्याने तिला ट्रिपल तलाक दिला. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिच्याकडे मागणी करत अखेर तिला घराबाहेर काढून दिले. सदर प्रकरणी तपास सुरू असतानाच पोलीस अधिकाऱ्याने ही मागणी केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी पती आणि या पोलिसाकडून आपल्याला धोका आहे असे तिने म्हटलेले आहे.


शेअर करा