लग्न झाल्यावर चारच दिवसात नववधू गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघड : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

चित्र प्रतीकात्मक

लॉकडाऊनमुळे पोलीस करत असलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असताना काही ठिकाणी मात्र वर्दीला काळिंबा फासण्याचे देखील प्रकार देखील उघड होत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामधील जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला असून, कापूस वेचण्याच्या कामाला येत असलेल्या तरुणीवर शेत मालक असलेल्या कैलास तुकाराम धाडी (रा.लोणवाडी, ता.जळगाव) याने अत्याचार असल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. यातून ही पीडिता गर्भवती राहिली. कैलास हा जिल्हा पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असून एमआयडीसी पोलिसात पीडितेच्या फिर्यादीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०१९ मध्ये गावातील १९ वर्षीय तरुणी त्याच्या शेतात कापूस वेचण्याच्या कामासाठी आलेली असताना विहिरीवर पाणी घेण्यासाठी जाताना एका पत्र्याच्या शेडमध्ये कैलास याने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी तिला दिली. त्यामुळे पीडितेने या प्रकाराची वाच्यता केली नाही. मध्यंतरीच्या काळातही कैलास याने सतत त्याच पत्र्याच्या खोलीत वारंवार अत्याचार करायचा असे पिडीतेचे म्हणणे आहे . कैलास धाडी हा लोणवाडी येथील रहिवाशी असून पीडित महिला ही त्याच्या शेतात कापूस वेचण्यासाठी येत होती .

काही कालावधीनंतर, २४ मे २०२० रोजी पीडित तरुणीचे लग्न झाले मात्र चारच दिवसात तिला त्रास सुरु झाल्याने पती व सासरच्यांनी तिला चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात नेले असता पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.तेव्हा पीडितेने झाल्या प्रकाराची पती व सासरच्यांना माहिती दिली. सासरच्यांनी त्यानंतर तिला माहेरी पाठवून दिले. माहेरी आल्यावर तिने कुटुंबाला घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे, त्यानुसार कैलास तुकाराम धाडी याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात असून अधिक तपास सुरु असल्याचे समजते .

संबंधित बातम्या

भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल
https://nagarchaufer.com/?p=198

प्रेयसीला भेटण्याच्या ओढीने लॉकडाऊन तोडून रात्री घरातून निघाला मात्र पुढे जे घडले ये अकल्पित ?
https://nagarchaufer.com/?p=184

लॉकडाऊनदरम्यान सर्रास सुरु होते मसाज पार्लर,पोलिसी कारवाईत आठजण रंगेहाथ धरले : कुठली बातमी ?
https://nagarchaufer.com/?p=56

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80

एका मुलीची आई अविवाहित युवकाच्या प्रेमात, नवरा सोडून धरला प्रियकर मात्र ? : महाराष्ट्रातील बातमी #ExtraMaritalAffair
https://nagarchaufer.com/?p=239

अखेर हसीन जहाँने सोशल मीडियावर शेअर केला ‘ न्यूड ‘ फोटो , सोबत लिहले असे काही की ..
https://nagarchaufer.com/?p=233


शेअर करा