देशात पुन्हा एकदा नोटबंदी होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेले असून नागरिकांनी पाचशेच्या नोटा शंभर आणि दोनशे रुपयात लवकरात लवकर बदलून घ्याव्यात , असे देखील आवाहन त्यांनी केलेले आहे. नोटबंदी कधी होणार याबद्दल देखील त्यांनी काही संकेत दिलेले आहेत.
प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्त धुळे शहरात होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसवर सडकून टीका केलेली असून आरएसएस आणि भाजप हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. भाजप जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत मराठा समाजाला कधीच आरक्षण देऊ शकत नाही त्यामुळे भाजपचा डाव तुम्ही ओळखा , असा देखील सल्ला त्यांनी दिलेला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की , ‘ पॅलेस्टाईन मध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे तशाच पद्धतीने भारतात देखील आरएसएस आणि भाजप जाती जातीत आरक्षणाच्या नावावर संघर्ष पेटवण्याची शक्यता आहे मात्र असे काही घडणार नाही याची महाराष्ट्रातील जनतेने काळजी घेण्याची गरज आहे. नोटबंदी बद्दल बोलताना ते म्हणाले की , ‘ 2024 च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोटबंदी होईल त्यामुळे ज्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी त्या शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांमध्ये कन्व्हर्ट करून घ्याव्यात , असे देखील ते पुढे म्हणाले.