महिलेची छेड काढणं पडलं चांगलाच महागात..गावकऱ्यांनी मारहाण करून बनवला व्हिडीओ : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

महिलेची छेड काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. दारूच्या नशेत घरात घुसून त्याने महिलेची छेड काढली पण महिलेने त्याला चांगलीच अद्दल घडवली. त्याच्याशी चांगलाच पंगा घेत महिलेने पाठलाग करून गावकरी जमवले आणि त्याला पकडून एका झाडाला बांधलं आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची यथेच्छ धुलाई केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून सर्वांनी महिलेचं आणि स्त्री शक्तीचं भरभरून कौतुक केलं आहे. ( It was very expensive to pierce a woman .. The video was made by beating the villagers )

उपलब्ध माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील अचनाकपूर गावात एक व्यक्ती रात्री दारूच्या नशेत एका घरात घुसला. त्या घरात महिला एकटीच होती. महिलेला एकटं पाहून तो तिची छेड काढू लागला. महिलेने आरडाओरडा सुरू केला. गोंधळ ऐकून अनेक जण जमा झाले. लोक जमा होताच दारुच्या नशेत असलेला व्यक्ती घाबरला आणि तिथून तो पळू लागला. पण गावकरी देखील असल्याने पळून जाण्यात अपयशी ठरला.

महिलेने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बांधलं आणि त्याची यथेच्छ धुलाई केली. यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. मात्र ही संपूर्ण घटना घडत असताना काही लोकांनी याचा व्हिडीओ तयार केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


शेअर करा