दमदाटी करत ‘ कर्जवसुली ‘ करणाऱ्यांवर आरबीआयचा आसूड

शेअर करा

एकदा कर्ज दिल्यानंतर त्याच्या वसुलीसाठी क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा पार करण्यात आल्याच्या अनेक घटना रोज समोर येत असतात या पार्श्वभूमीवर आरबीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून लोन रिकव्हरी एजंटच्या त्रासाला कंटाळून गेलेल्या नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आलेली आहे. रिकव्हरी एजंट संध्याकाळी सातनंतर आपल्याला फोन करू शकणार नाहीत सोबतच आरबीआयने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी देखील कडक नियम करण्याचे प्रस्ताव दिलेले आहेत.

नवीन आदेशानुसार नुसार वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजंट कर्जदार व्यक्तींना सकाळी आठ वाजण्यापूर्वी तसेच रात्री सात नंतर कॉल करू शकणार नाहीत. आरबीआयने या प्रकरणी माहिती देताना आउटसोर्सिंग व्यवस्थेमुळे ग्राहकांप्रती असलेली वित्तीय संस्थांची जबाबदारी कमी होणार नाही हे निश्चित करायला हवे. डायरेक्ट सेल्स एजंट डायरेक्ट मार्केटिंग एजंट आणि वसूल एजंटसाठी कोडकंडक्ट अर्थात आचारसंहिता तयार करायला हवी सोबतच त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षित देखील करायला हवे जेणेकरून ते आपली जबाबदारी संवेदनशीलपणे पार पाडतील.

आरबीआयने पुढे म्हटले आहे की , ‘ रिकव्हरी एजंट आणि त्यांचे रिकव्हरी एजंट कर्जवसुलीसाठी कुठल्याही व्यक्तीला धार्मिक तसेच शारीरिक दृष्ट्या कुठल्याही प्रकारची धमकी देऊ शकत नाही अथवा त्यांचा छळ करू शकत नाहीत. वसुली एजंट कर्जदारांना सार्वजनिकरित्या अपमानित देखील करू शकत नाहीत तसेच त्यांच्या गोपनीयतेत देखील हस्तक्षेप करू शकत नाहीत ‘ असे म्हटलेले आहे . सदर निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर अनेक शासकीय संस्था देखील अडचणीत येणार असून याआधी देखील थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन ढोल वाजवणे त्यांची नावे भर चौकात फ्लेक्स वर जाहीर करणे असे प्रकार शासकीय संस्थांनी देखील केलेले आहेत .


शेअर करा