राजस्थानमध्ये भाजपला झटका , साध्वी अनादी सरस्वती काँग्रेसमध्ये दाखल

शेअर करा

देशात पाच राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असून राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारांची अक्षरशः रांग लागलेली आहे तर दुसरीकडे भाजप मात्र अद्यापही चाचपडत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी असलेली काँग्रेस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सभांचे आयोजन करण्यात आलेले असून भाजपच्या राजस्थान येथील नेत्या साध्वी अनादी सरस्वती यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , त्यांचे खरे नाव ममता कलानी असून त्या स्वातंत्र्यसैनिक हेमू कलानी यांच्या कुटुंबातून येतात. साध्वी अनादी सरस्वती यांना अजमेर उत्तर मतदार संघातून भाजपचे दिग्गज मंत्री वासुदेव देवनानी यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राजस्थानच्या लेडी योगी म्हणून त्यांची ओळख असून राज्याच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे. त्या अजमेर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून हिंदुत्वाचा प्रमुख चेहरा मानल्या जातात. भाजप सोडून त्या काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत.


शेअर करा