मोबाईलमध्ये प्रॉब्लेम नाही तर निम्म्या राज्यात झालाय वोडाफोन-आयडियाचा बट्याबोळ : वाचा पूर्ण बातमी

शेअर करा

मुंबई पुणे अहमदनगरसह या रिजनमध्ये असलेल्या बहुतांश ठिकाणी आज आयडिया- व्होडाफोनचे नेटवर्क सकाळपासून बंद पडलेले आहे. ओटीपी येण्यापासून तर कॉलपर्यंत सर्व काही बंद झालेले आहे. आज सकाळपासूनच हा प्रॉब्लेम सुरु झालेला आहे. कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. (network collapse of vodafone idea in Maharashtra Pune Mumbai Ahmednagar Nagpur )

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कालपासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे लोक अडचणीत असतानाच यात आणखी भर पडलेली आहे . सकाळपासून नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना अर्ध्या तासापूर्वी रेंज आली आहे. मात्र ज्यांना रेंज आली त्यांचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे . तांत्रिक अडचण असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे.

पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावती येथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे.

सध्या राजभरातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच शाळांच्या अर्ध वार्षिक परीक्षा सुरू आहेत. व्होडाफोनच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. रेंजच्या प्रॉब्लेममुळे ग्रामीण भागात आधीच ऑनलाईन शिक्षणाचा बट्याबोळ असल्याने शहरात देखील आज मोठा त्रास नेटवर्कच्या अडचणीमुळे झालेला आहे.


शेअर करा