
लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आलेला असून वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी सिल्लोड तहसील कार्यालयातील एका कारकुनाला वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विकास प्रकाश तुपारे ( वय 39 ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव असून तक्रारदार व्यक्ती हे वाळू वाहतूकदार आहेत. तलाठी जाधव यांनी कारवाई करत तक्रारदार यांचे काही ट्रॅक्टर पकडलेले होते आणि त्याचा अहवाल त्यांनी सिल्लोड येथील तहसील कार्यालयात पाठवलेला होता.
तहसील कार्यालयातील कारकून तुपारे याने कारवाई न करण्यासाठी 70 हजार रुपये लाचेची मागणी केली त्यामध्ये चाळीस हजार रुपये तहसीलदारांना देईल तलाठ्याला वीस हजार आणि मला दहा हजार असा व्यवहार देखील त्याने ठरवलेला होता . 27 ऑक्टोबर रोजी तीस हजार रुपये तक्रारदाराने दुपारी त्याला दिलेले होते आणि राहिलेले ४०००० तुला नंतर देईन असे सांगितले होते.
तक्रारदारी व्यक्ती यांनी त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ टोल फ्री नंबरवर फोन केला आणि त्यानंतर तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. तडजोड करून वीस हजार रुपयांची लाच घेत असताना सिल्लोड पोलिसांनी दुपारी त्याला ताब्यात घेतलेले आहे . पोलीस अधीक्षक संदीप आटोळे , पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मोठेकर यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.