शादाब खान प्रत्यक्षात निघाला राजवीर , अन राज्य विचाराल तर..

शेअर करा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी तसेच इतर मोठ्या उद्योगपतींना धमक्यांचे ई-मेल पाठवल्या प्रकरणी गोदी मीडिया धार्मिक तेढ निर्माण करण्याची संधी शोधत असताना दुसरीकडे गावदेवी पोलीस ठाणे आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तेलंगाना आणि गुजरात मधील दोन जणांना अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , राजवीर जगतसिंह खंत ( वय 20 वर्ष राहणार कलोल गांधीनगर गुजरात ) आणि गणेश वनपारधी ( वय 19 राहणार तेलंगाना ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचे देखील समोर आलेले आहे. गणेश याने मोबाईल फोनवरून एक धमकीचा ई-मेल मुकेश अंबानी यांना पाठवला होता तर गुजरातचा रहिवासी राजवीर याने शादाब खान नावाने खोटे अकाउंट तयार करून चार ईमेल पाठवलेले होते..

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर गेल्या आठ दिवसात पाच धमक्याचे ईमेल आल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी वीस कोटी रुपये दिले नाहीत तर तुमची हत्या करू. आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत असे म्हटलेले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा खंडणीची रक्कम वाढवून 200 कोटी करण्यात आली. आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष कराल तर तुमचे डेथ वॉरंट काढू असे देखील म्हटलेले होते.

पुन्हा एकदा ई-मेल शनिवारी आला त्यावेळी चारशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रमुखांनी अखेर गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर गावदेवी पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन राजवीर याला अटक केलेली आहे. सायबर क्षेत्रातील तो तज्ञ असून त्याचा आयपी ऍड्रेस बेल्जियमचा आढळून येत होता केवळ गंमत म्हणून आपण शादाब खान नावाने अकाउंट तयार केले आणि हा प्रकार केला असे त्याने सांगितलेले आहे.


शेअर करा