
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 15 नोव्हेंबर पासून 23 नोव्हेंबरपर्यंत राज्यव्यापी दौरा करण्याचे जाहीर केलेले असून दौऱ्याचे नियोजन देखील जाहीर करण्यात आलेले आहे . एक डिसेंबरपासून पुन्हा एकदा राज्यात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार असून 24 डिसेंबर ही तारीख मराठा बांधवांच्या जीवनातील प्रकाश आहे असे सांगत आमच्याजवळ शांततेचे ब्रह्मास्त्र आहे. राज्य सरकारने ते बाहेर काढण्यास लावू नये असे म्हणून जरांगे पाटील यांनी म्हटलेले आहे.
अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथे उपचार सुरू होते . प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेले असून एक डिसेंबर पासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन केलेले आहे.
सद्य परिस्थितीत कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू असून कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहन करतानाच त्यांनी आरक्षणाच्या निर्णयाची चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ आलेले नाही. सरकारने फार चालढकल करू नये नाहीतर आम्ही आमचे शांततेचे ब्रह्मास्त्र बाहेर काढू , असे देखील म्हटलेले आहे . डॉक्टर , व्यावसायिक , उद्योजक कोणीही दौऱ्याला पैसे देऊ नये कारण आमचा लढा हा सामान्यसाठीचा लढा आहे पैसे कमावण्यासाठी नाही , असे देखील ते पुढे म्हणाले.
नगर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील हे 22 नोव्हेंबर रोजी येणार असून संगमनेर ते श्रीरामपूर इथे आल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर पासून नेवासा पासून शेवगाव आणि शेवगाव पासून बोधेगाव आणि बोधेगाव पासून धोंडराई ते अंतरवाली सराटी असा त्यांचा नगर जिल्ह्यातील दौरा राहणार आहे. 15 नोव्हेंबर पासून दौऱ्याला सुरुवात करण्यात येणार असून धाराशिव , सोलापूर , सांगली , कोल्हापूर , सातारा , पुणे , कल्याण , ठाणे , पालघर या ठिकाणी देखील दौऱ्याचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे.