एक कोटीच्या लाचेतील आरोपी गणेश वाघसाठी एअरपोर्ट देखील अलर्ट , एकाला जामीन पण..

शेअर करा

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या नगर एमआयडीसी येथील एक कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणातील पहिला आरोपी अमित गायकवाड हा सध्या जामिनावर बाहेर असून दुसरा आरोपी तत्कालीन उपाभियंता गणेश वाघ याच्या जामीन अर्जावर 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. अमित गायकवाड याला अटक करण्यात आल्यानंतर तेव्हापासून गणेश वाघ हा फरार झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नागपूर एमआयडीसीतील बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेले होते. नगर मनमाड रोडवरील शेंडी बायपास चौकात ही कारवाई शुक्रवारी तीन तारखेला करण्यात आली त्यानंतर दोघांमधील संभाषण देखील समोर आलेले असून त्यामध्ये गणेश वाघ याने अमित गायकवाड याला ‘ तुझ्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले ‘ असे म्हटलेले होते.

आरोपी गणेश वाघ हा देखील यात सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आलेली आहेत तर दुसरीकडे त्याने नगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला असून 22 नोव्हेंबर रोजी अंतरिम सुनावणी होणार आहे त्यावेळी त्याचा जामीन नाकारण्यात आला तर त्याला हजर करण्याचे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे.

ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी मुख्य आरोपी असलेला अमित गायकवाड याने लाचेची रक्कम मिळाल्यास मिळाल्यानंतर उपअभियंता गणेश वाघ याला फोन केला त्यावेळी त्यांच्यात संभाषण झालेले होते. आरोपी गणेश वाघ याच्या शोधार्थ पोलिसांनी पुणे बुलढाणा छत्रपती संभाजीनगर येथे त्याचा घराची झडती घेतली मात्र तो कुटुंबीयांसोबत फरार झालेला असून तो देश देखील तो सोडू शकतो त्यामुळे विमानतळ प्राधिकरण देखील सक्रिय झालेले आहे

लाच प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अमित गायकवाड याला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेला असला तरी त्याच्या जामीनाच्या विरोधात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलेले असून दिवाळीची सुट्टी उरकली की त्यानंतर दोन्ही आरोपींच्या जामीनाबाबतचा निर्णय होणार आहे.


शेअर करा