
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारातील कारभारी रामदास शिरसाठ या शेतकऱ्याचा कापूस चोरांनी केलेल्या मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झालेला होता. सदर घटनेनंतर शेतकरी बांधवांमध्ये एकच खळबळ उडालेली असून रविवारी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शिरसाठ कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केलेले आहे.
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासोबत संपर्क साधून घटनेतील प्रमुख आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केलेली आहे.
शिवाजी कर्डिले म्हणाले की , ‘ शेतकऱ्यांच्या डाळिंब कापूस संत्रा मोसंबी अशा पिकांची चोरी होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असून रात्रीच्या वेळी घर सांभाळावे की शेत सांभाळावे अशी मनस्थिती शेतकरी बांधवांची झालेली आहे अशा परिस्थितीत अशा घटना पुढे घडू नयेत म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी असे प्रकार गांभीर्याने घेऊन घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी ‘, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.