काँग्रेस पक्षासोबत इमानदार सांगणाऱ्यांचा इतिहास , राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की..

शेअर करा

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलेला असून , ‘ काँग्रेस पक्षासोबत कायम इमानदार राहिले आहोत असे सांगणाऱ्यांचा इतिहास जनतेला चांगलाच माहित आहे. त्यांनी पक्ष संघटनेला धरून किती काम केले ? मेहुणे लोकसभेला उमेदवारी करत असताना त्यांनी कुणाला मते दिली हे सर्व जनतेला माहित आहे ‘, असे म्हटलेले आहे .

नाशिककडे जाताना संगमनेर इथे राधाकृष्ण विखे पाटील थांबलेले होते त्यावेळी त्यांनी हा हल्लाबोल केलेला असून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , ‘ संगमनेर येथील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील होते मात्र आता दुसरेच संस्थापक तयार करण्यात आलेले आहे. आमच्यावर टीका करून स्वतःची पापे झाकण्याचा प्रयत्न करत आहात. मला देखील त्यांच्या वडिलांबद्दल बोलता येईल मात्र जे व्यक्ती हयात नाही त्यांच्याबद्दल आपण बोलणार नाही , ‘ असे देखील ते म्हणाले .


शेअर करा