
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असून मनोज जरांगे पाटील यांनी , ‘ सरकारला प्रथम चाळीस दिवसांचा वेळ दिला होता आता परत दोन पावले मागे सरकलो. 24 डिसेंबरपर्यंत वेळ आपण दिलेला आहे आता तरी सरकारने मराठ्यांसोबत गद्दारी करू नये. एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्यांच्या मागे पळायचे नाही एवढेच काय त्यांच्या सतरंज्या उचलण्या बंद करा , ‘ असे स्पष्ट आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहे. 12 तारखेला त्यांनी बालानगर येथे संवाद मिळावा घेतला त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की , ‘ आता सरकारने मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये आणि गोरगरिबांच्या मुलाला 24 डिसेंबरपर्यंत सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा अध्यादेश काढून आरक्षण देऊन टाकावे. एक डिसेंबर पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असून साखळी उपोषण हे शांततेच्या मार्गाने होणार आहे. इतर समाज बांधवांच्या भावना दुखावतील असे वर्तन त्यात करू नये .’
राजकीय नेत्यांच्या मागे फिरून त्यांना मोठे करण्यापेक्षा आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आरक्षण लढ्यात सक्रिय सहभागी व्हा. राजकीय नेते दोन समाजात भांडण लावण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या भूलथापांना कोणीही बळी पडू नका. आतापर्यंत राजकीय नेते आपल्या जीवावरच मोठे झालेले आहोत आणि आज आपल्यावर वेळ आली तर आपल्या लेकरांसाठी एक शब्दही बोलायला तयार नाहीत म्हणून तुम्ही हुशार व्हा ‘ . काही राजकीय नेत्यांनी देखील मराठा समाजाच्या सरसकट कुणबी आरक्षणाला विरोध करू नये असे देखील खडे बोल त्यांनी सुनावलेले आहेत.