बायकोच्या प्रियकराचा खून करून गेला उत्तर प्रदेशात , भिवंडी पोलिसांनी धरला

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार भिवंडी इथे समोर आलेला असून बायकोचे इतरत्र अनैतिक संबंध असल्याकारणाने उत्तर प्रदेशात निघून गेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नवऱ्याने एका व्यक्तीचा खून करून त्यानंतर उत्तर प्रदेशात पलायन केले होते मात्र भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलेले आहे

उपलब्ध माहितीनुसार , भिवंडी शहरातील अंजुर फाटा रेल्वे स्टेशन इथे आठ नोव्हेंबर रोजी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आलेला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मयत व्यक्तीची ओळख ही सद्दाम इसहाक हुसेन ( वय 19 राहणार कामत नगर ) अशी समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याबद्दल चौकशी सुरू केली त्यावेळी मयत व्यक्ती याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा सुरेंद्र कन्हैयालाल सोनकर ( वय 40 राहणार कामतनगर ) याने त्याची हत्या केल्याचे समोर आलेले आहे. संशयित असलेला आरोपी सुरेंद्र यांच्या पत्नीचे मयत तरुण सद्दाम याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याने सुरेंद्र आणि त्यांची पत्नी यांच्यात वाद होत होते. असाच एकदा वाद झाल्यानंतर सुरेंद्र याची पत्नी उत्तर प्रदेशातील तिच्या मूळ गावी निघून गेली. ती माहेरी निघून जाण्यामागे सद्दाम याचाच हात आहे असा संशय असल्याकारणाने भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस पथक आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशात दाखल झाले आणि त्यानंतर जौनापूर येथील बक्सा पोलीस ठाणे हद्दीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

सदर प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कन्हैयालाल सोनकर हा सराईत गुन्हेगार गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आलेले असून आत्तापर्यंत त्याच्या विरोधात चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा सुमारे 25 गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी हा उत्तर प्रदेश इथे जाऊन पत्नीची देखील हत्या करणार होता मात्र त्यापूर्वीच त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.


शेअर करा