महाराष्ट्र हादरला..अल्पवयीन मुलीला कीटकनाशक पाजून अत्याचार केल्यावर मारण्याचा केला प्रयत्न

  • by

हाथरसमधल्या घटनेने सर्व देशभर उद्रेक निर्माण झालेला असतानाच महाराष्ट्रात देखील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण काही कमी नसल्याचे दिसत आहे . अमरावती जिल्ह्यातल्या वरूडजवळ माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला आधी विष पाजलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. Attempted to kill a minor girl after torturing her with pesticides

उपलब्ध माहितीनुसार, अत्याचार झालेली अल्पवयीन पीडित तरुणी ही आपल्या घराचे दार बंद करून अभ्यास करत होती. त्याचवेळी घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने त्या पीडित मुलीला पेपर वाचायला मागितला. त्यानंतर ती मुलगी पेपर आणायला घरात गेली असताना आरोपीने तिला किटकनाशक पाजले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून 55 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी हा पीडित मुलीच्या घराजवळ राहणारा असल्याने त्याने ओळखीचा फायदा घेत हे कृत्य केलं आहे. महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये ओळखीचे , नातेवाईक, मित्र यांच्याकडूनच होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे .पीडित तरूणीच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरुडचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी दिली आहे.आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.