‘ आ रही है काँग्रेस.. ‘ , राहुल गांधी म्हणाले आता देशात

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला असून ‘ तेलंगणातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यास बीआरएस सरकार अकार्यक्षम राहिलेले आहे त्यामुळे केवळ तेलंगानाच नव्हे तर देशभरात लोककेंद्रीत सरकारचे युग आणण्याची वेळ परत आलेली आहे ‘ असे म्हटलेले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकऱ्यांना वेळेवर मदत केली नाही म्हणून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेले आहे. राहुल गांधी यांनी तेलंगानामध्ये 2020 मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट दिल्याचा व्हिडिओ यूट्यूब चैनल वरून शेअर केलेला असून त्यामध्ये त्यांनी तेलंगानातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत , असे म्हटलेले आहे.

राहुल गांधी म्हणाले की , ‘ रांगेत सर्वात मागे असलेल्या अंतिम व्यक्तीचा आवाज महत्त्वाचा असतो अशी शिकवण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेली होती . तेलंगणातील शेतकरी कुमार चंद्रया यांचा देखील आवाज असाच होता मात्र त्याच्याकडे मुख्यमंत्री के सी आर यांनी दुर्लक्ष केलेले आहे. चंद्रया हे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत होते. कर्जाचे ओझे वाढत गेल्यानंतर त्यांनी अखेर आत्महत्या केली. त्यांच्या घरी जाऊन आपण सांत्वन केले ‘, असे देखील सांगत जर या कुटुंबाला वेळेला मदत मिळाली असती तर चंद्रया हयात राहिले असते असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की , ‘ तेलंगानातील सध्याची सत्ता असलेले बीआरएस सरकार आणि भाजप सरकार तेलंगणाच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेले आहे त्यामुळे सर्व घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी आमचा लढा सुरू झालेला आहे केवळ तेलंगानाच नव्हे तर राज्यभरात देशभरात लोककेंद्रीत शासनाचे युग परत आणण्याची वेळ आलेली आहे ‘, असे देखील ते पुढे म्हणाले. काँग्रेस सत्तेत आली तर महिलांना प्रतिमाह पंचवीसशे रुपये , मोफत बस, शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये तर शेतमजुरांना बारा हजार रुपयांची मदत करण्यात येईल असे देखील राहुल गांधींनी म्हटलेले आहे सोबत पाचशे रुपयात गॅस सिलेंडरचे देखील आश्वासन त्यांनी जनतेला दिलेले आहे.


शेअर करा