‘ गूढ ‘ बनून राहिलेल्या हत्याकांडात अखेर आरोपी जेरबंद , रांजणगावमधील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पुणे जिल्ह्यात रांजणगाव एमआयडीसी परिसरात प्रियकरासोबत पळून आलेल्या एका अल्पवयीन मुलीला दिवस गेले आणि त्यानंतर तिने बाळाला देखील जन्म दिला . बदनामीच्या भीतीने आरोपी बापाने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला एका विहिरीत फेकून दिले त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस यांनी कारवाई करत यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सेवानगर येथे आरोपी पिता त्याची आई आणि आजी या तिघांनाही ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , संदीप बळीराम राठोड ( वय एकवीस वर्ष राहणार सेवानगर आर्णी ) असे आरोपीचे नाव असून रोजगाराच्या शोधात तो पुण्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे पोहोचलेला होता . तिथे गेल्यानंतर त्याला काम धंदा देखील मिळाला आणि याच दरम्यान मोठ्या भावाच्या सालीसोबत त्याचे प्रेम संबंध सुरू झाले व त्याने तिच्यासोबत आरोपी रांजणगाव मध्येच राहू लागला मात्र लग्न त्यांचे झालेले नव्हते.

दरम्यानच्या काळात त्यांच्या शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यानंतर या तरुणीला दिवस देखील गेले . लग्न न करता बाळ झाल्यानंतर त्याला बदनामीची भीती वाटू लागली म्हणून त्याने स्वतःच्या सहा महिन्याच्या बाळाचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिला आणि प्रेयसीला घेऊन मूळ सेवादास नगर इथे जाऊन राहू लागला.

रांजणगाव इथे नऊ तारखेला एका विहिरीत बाळाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि अहवाल आल्यानंतर या बाळाचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समोर आले. सहा महिन्यापूर्वी कुणाची डिलिव्हरी झाली होती का ? याचा पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रत्येक पत्त्यावर जाऊन खातरजमा केली त्यावेळी अखेर 13 तारखेला पोलिसांना बाळाची ओळख पटली.

आरोपी संदीप आणि त्याची प्रेयसी जिथे राहत होते तिथे पोलीस पोचले मात्र तेथून ते फरार झालेले होते त्यानंतर तात्काळ यवतमाळकडे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली आणि 14 नोव्हेंबर रोजी संदीप राठोड त्याची प्रेयसी आणि आई या तिघांनाही ताब्यात घेतलेले आहे. आरोपीने मात्र बाळ सतत आजारी राहत होते म्हणून आपण त्याचा खून केलेला आहे असे म्हटलेले असून सहा महिन्यात बाळावर एकदाही रुग्णालयात उपचार केल्याची नोंद कुठेही आढळून आली नाही. आपली आणि प्रेयसीची बदनामी नको म्हणून आरोपीने हा प्रकार केल्याचा अंदाज वर्तवला जात असून आरोपीने हा प्रकार केला तेव्हा बाळाची आई आणि आजी कशामुळे गप्प राहिल्या होत्या ? याचा देखील पोलीस सध्या तपास करत आहेत .


शेअर करा