नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना संगमनेर तालुक्यात कुरकुटवाडी इथे समोर आली होती. एका तरुणाचा खून करून त्यानंतर त्याचा त्याच्यावर बिबट्याने हल्ला केलेला आहे असा आभास निर्माण करण्यात आलेला होता मात्र तपासाअंती हा प्रकार मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या कारणातून झाल्याचे समोर आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सचिन कुरकुटे असे मयत तरुणाचे नाव असून घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे या प्रकरणाचा तपास करत होते. सचिन कुरकुटे याच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास केल्यानंतर त्याने एका मैत्रिणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती त्यामुळे सचिन कुरकुटे आणि गणेश बबन कुरकुटे यांच्यात वाद देखील झालेला होता.
रात्री साडेबाराच्या सुमारास सचिन याच्यावर हल्ला झाला आणि या हल्ल्यांमध्ये त्याच्या मानेवर खोल जखम झालेली होती. सचिन याला उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वी त्याचा मृत्यू झालेला होता . बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा होती आणि सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद देखील करण्यात आली होती.
संबंधित गुन्ह्याची कागदपत्रे घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आली त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सचिन कुरकुटे याचे आर्थिक व्यवहार तसेच घरगुती व इतर लोकांसोबत असलेले वाद प्रेमसंबंध या सर्व शक्यता गृहीत धरून तपासाला सुरुवात केली आणि अखेर गणेश बबन कुरकुटे ( वय 21) याला अटक केली. आरोपीने खून केल्याची कबुली दिलेली आहे.