..म्हणून पोलीस पाटलांची दिवाळी अंधारातच गेली , सरकारकडून दुर्लक्ष

शेअर करा

ग्रामीण भागात अनेक तपासांमध्ये पोलिसांना मदतीचा हात म्हणून ओळख असलेले पोलीस पाटील यांना अहोरात्र काम करून देखील गेल्या तीन महिन्यापासून कुठलेही मानधन मिळालेले नाही . पोलीस आणि महसूल यंत्रणेसाठी रात्रंदिवस झटून देखील मानधन रखडल्याने पोलीस पाटलांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे .

पोलीस पाटील यांचा दिवाळी सणदेखील मानधना विना गेलेला असल्याकारणाने अंधारातच दिवाळी त्यांना साजरी करावी लागलेली आहे. शासनाने पोलिसांसाठी तसेच महसूल विभागासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पोलीस पाटलांच्या अडचणी कधीतरी समजावून घ्याव्यात अशी मागणी पोलीस पाटलांकडून करण्यात येत आहे.

शासन आणि जनता यांच्यात अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलांची महाराष्ट्रात ओळख आहे. अहोरात्र 24 तास आपल्या पद्धतीने ते सेवा बजावत असतात मात्र त्यांच्या कामाच्या मोबदल्यात सरकार त्यांना मुळातच अत्यल्प मानधन देते . त्या मानधनात दैनंदिन गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत तरीदेखील मानवतेच्या भूमिकेतून आणि गावगाडा व्यवस्थित राहावा म्हणून पोलीस पाटील सक्रिय असतात.

ऐन दिवाळीच्या सुमारास देखील मानधन मिळालेले नसल्याने पोलिसांनी पोलीस पाटलांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरकारकडून दिवाळीसारख्या सणाला शासकीय निमशासकीय तसेच मानधनावरील व्यक्तींना देखील आर्थिक लाभ दिला जातो मात्र पोलीस पाटलांना आहे ते वेतन मिळण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.


शेअर करा