नगर जिल्ह्यात ‘ काय सुरु काय बंद ‘ : १५ ऑक्टोबरपासून काय आहेत नवीन निर्देश ?

शेअर करा

राज्य शासनाने मिशन अंतर्गत दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत परवानगी दिल्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आता रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबतचा आदेश जारी केला असून 15 तारखेपासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे मात्र शाळा, महाविद्यालय, जिम आणि धार्मिक स्थळे ऑक्‍टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

पुनश्च हरिओम अंतर्गत राज्य शासनाने व्यवहार सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वरील प्रमाणे आदेश दिला आहे. मार्केट, दुकानांमध्ये गर्दी नियंत्रित करणे, गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. कलम 144 प्रमाणे जमावबंदी आदेश मात्र कायम राहणार आहे त्यानुसार एकत्र येण्यास मात्र मनाई राहणार आहे.

शाळेमध्ये शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती, कौशल्य विकसित करणाऱ्या प्रशिक्षण संस्था,औद्योगिक संस्था,शिक्षण संस्थांमध्ये प्रयोगशाळेतील कामे, शासकीय व खाजगी ग्रंथालयांना परवानगी, गार्डन, उद्याने, सार्वजनिक मोकळ्या जागांवरील करमणूक, स्थानिक आठवडे बाजार, जनावरांचे बाजार, व्यवसायिक प्रदर्शन याला परवानगी देण्यात आलेली आहे हे तर शाळा, महाविद्यालय, जिम, जमावाने एकत्र येणे, रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत फिरणे आणि धार्मिक स्थळे इत्यादी मात्र बंद राहणार आहे.


शेअर करा