लोकसभेच्या सेमीफायनलला सुरुवात , पाच राज्यातील निकाल ‘ ह्या ‘ तारखेला येणार

शेअर करा

पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झालेले असून आज 17 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश विधानसभेसाठी पहिल्या एकमेव फेरीतील मतदान तर आणि छत्तीसगड विधानसभेसाठी दुसऱ्या व अंतिम फेरीतील होत आहे. दोन्ही राज्यातील दिग्गज नेत्यांचे राजकीय भव्य आज मतपेटीत कैद होणार असून मध्य प्रदेश मधील 230 तर छत्तीसगड मधील 70 जागांसाठी ( एकूण ९० जागांपैकी ७ नोव्हेंबरला २० जागांचे मतदान झालेले आहे ) आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरू असतानाच नक्षलवादी हल्ला छत्तीसगडमध्ये झालेला आहे.

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केलेला असून एका पाठीमाग एकापाठोपाठ स्फोट करण्यात आले त्यामध्ये दुचाकीवरून जाणारे सीआरपीएफचे दोन जवान थोडक्यात बचावलेले आहेत. नक्षलवाद्यांकडून कालच मतदानावर बहिष्काराचे पोस्टर गावात लावण्यात आलेले होते त्यामुळे यंत्रणा सतर्क होती म्हणून सुदैवाने जीवितहानी अद्यापपर्यंत झालेली नाही.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षांमध्ये मुख्यत्व: लढाई पाहायला मिळत असून मध्य प्रदेशातील बुधनी या मतदारसंघातून मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण सध्या निवडणूक लढवत आहेत. मध्य प्रदेशात मागील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली होती मात्र ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने फोडून त्यानंतर मध्यप्रदेशात सत्ता हस्तगत केलेली होती त्यामुळे भाजपच्या विरोधात मध्यप्रदेशात मोठी लाट पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे छत्तीसगढ इथे देखील भाजपसाठी अनुकूल परिस्थिती नसून 70 जागांसाठी आज मतदान होत आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पाटणमधून निवडणूक लढवत आहेत तर भाजपने नेहमीप्रमाणे त्यांच्याच घरातील एका व्यक्तीला फोडून उमेदवारी दिलेली आहे. बघेल यांचा पुतण्या विजय बघेल सध्या काकाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असून तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सध्या विधानसभा निवडणूक मध्यप्रदेश , छत्तीसगढ , तेलंगणा , राजस्थान आणि मिझोराम या राज्याच्या असून सर्व निकाल तीन डिसेंबर रोजी येणार आहेत.


शेअर करा