तब्बल 181 मराठा आंदोलकांची दिवाळी तुरुंगात , 307 सारखे गुन्हे लावून..

शेअर करा

मराठा आरक्षणावरून काही दिवसांपूर्वी बीड इथे राजकीय नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात जाळपोळ केल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या. सदर जाळपोळ कोणी केली याविषयी मात्र कोर्टात केस सुरु असून याच घटनेवरून काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते . तब्बल 181 जणांना पोलिसांनी अटक केली असून काहीजण पोलीस कोठडीत तर काही न्यायालयीन कोठडीत आहेत. दुर्दैवाने या सर्व आंदोलकांना दिवाळी जेलमध्ये साजरी करण्याची वेळ आलेली आहे. सदर घटनेनंतर मराठा बांधवांमध्ये हा प्रकार केवळ काही नेत्यांच्या सांगण्यावरून केला जात असल्याचा संताप पाहायला मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली इथे उपोषण सुरू असताना 30 आणि 31 तारखेला बीडमध्ये राष्ट्रवादी भवन , माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर , शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे , भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के , बीआरएसचे दिलीप गोरे यांची कार्यालय पेटून देण्यात आलेली होती. आमदार प्रकाश सोळुंके आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडला त्यानंतर पोलिसांनी 307 सारखे गंभीर गुन्हे आंदोलकांवर लावलेले होते आणि तब्बल 181 जणांना अटक करण्यात आली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तरी आंदोलकांना त्यांच्या घरी दिवाळी साजरी करावी साजरी करता येईल अशी मराठा आंदोलकांना आशा होती मात्र दिवाळी तुरुंगात साजरी करण्याची वेळ मराठा आंदोलकांवर आलेली आहे. अद्याप देखील पोलिसांची याच प्रकरणात धरपकड सुरू असून इतर जिल्ह्यातील देखील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

मराठा बांधवांकडून मात्र ही कारवाई एकतर्फी आणि काही नेत्यांच्या सांगण्यावरून केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणी ‘ बीड जाळपोळ प्रकरणात हल्लेखोराची ओळख पटवून मग आरोपी ताब्यात घेतला जात आहे. उपलब्ध व्हिडिओ आणि सीसीटीव्हीमध्ये आलेल्या हल्लेखोरांची ओळख पटवून मग कारवाई केली जात आहे. ते कोणत्या समाजाचे आहेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसून आमच्यासाठी आरोपी आरोपीच आहे ‘ असे सांगण्यात येत आहे.


शेअर करा