अवघ्या शंभर दिवसात आरोपीस फाशीचा निर्णय , बालदिनाच्या दिवशी..

शेअर करा

देशात काही दिवसांपूर्वी केरळ मधील एरणाकुलम जिल्ह्यातील अल्वा इथे एका पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण समोर आलेले होते. सदर प्रकरणी बाल दिनाच्या निमित्ताने न्यायालयाने निकाल जाहीर केलेला असून या नराधम व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार , एरणाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथे अश्वक आलम नावाच्या एका बिहारच्या तरुणाने 28 जुलै रोजी एका मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली होती आणि त्यानंतर त्याने तिचा मृतदेह गोणीत बांधून कचऱ्यात फेकून दिला. घटना घडल्यानंतर शंभराव्या दिवशी चार नोव्हेंबर रोजी न्यायालयाने आरोपी अश्वक याला दोषी ठरवले आणि 14 नोव्हेंबर बालदिन ज्या दिवशी आहे त्या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली.

आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी पीडित मुलीचे आई-वडील न्यायालयात हजर होते. आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी असा युक्तिवाद सरकारी वकील यांनी केलेला होता. शिक्षेवरील युक्तिवादाच्या दरम्यान आरोपी अश्वक याने न्यायालयात इतर आरोपींना सोडून देण्यात आलेले आहे मात्र केवळ मलाच पकडण्यात आलेले आहे इतकाच युक्तिवाद केला. न्यायालयाने शिक्षा सुनावलेली असली तरी तिची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केलेली आहे .

28 जुलै रोजी आरोपीने अवघ्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि गळा दाबून तिचा खून केला. पॉक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश यांनी 28 वर्षीय मजुराला याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. शंभर दिवसात ही सुनावणी पूर्ण झालेली असून जोपर्यंत फाशी आरोपीला दिली जात नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरू राहणार असे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटलेले आहे.


शेअर करा